Punyashlok

महाराष्ट्र शासन | Government of Maharashtra

महामंडळामार्फत राबविण्यात येणारे उपक्रम

अ.क्र. योजना माहिती
1 वैरण विकास कार्यक्रम महामंडळाच्या १० मेंढी व शेळी पैदास प्रक्षेत्रावर १८१०.१० हेक्टर जमिन उपलब्ध असून, त्यामध्ये १३८.९१ हेक्टर बागायत, २८७.९५ हेक्टर जिरायत, ७९७.८२ हेक्टर चराऊ कुरणासाठी, ३४४.१३ हेक्टर वनीकरणाखाली, १६४.४९ हेक्टर तलावाखाली आणि ७६.८ हेक्टर रस्ते, इमारतीखाली आहे.
वर्ष लागवडीखाली आलेली जमीन (हे.) वैरण उत्पादन मुरघास मे.टन
2022-23 427.06 6066 62.9
2023-24 307.00 5963 139.3
2024-25 657.96 2785 128.8
2 सुधारीत जातीचे चारा बियाणे व संकरीत गवतांचे ठोंबे उत्पादन व पुरवठा महामंडळाच्या प्रक्षेत्रावर शेळ्या - मेंढया करिता उपयुक्त असलेले सुधारीत जातीचे चारा बियाणे व संकरीत गवतांचे ठोंबे (डीएचएन-६, बी एच एन-१०) उत्पादित करून शेळी मेंढी पालकांना / शेतकऱ्यांना रास्त दरात उपलब्ध करून दिले जाते.
वर्ष शेतकऱ्यांना पुरवठा करण्यात आलेली चारा पिकांची ठोंबे/ बेणे (संख्या) चारा पिकांची ठोंबे/ बेणे पुरवठ्यापोटी प्राप्त उत्पन्न (रु.)
2022-23 9743187 9743187
2023-24 5144674 5144674
2024-25 2743200 2743200
3 शेळी मेंढी पालन प्रशिक्षण मेंढी व शेळी पालन व्यवसाय व्यवस्थापनाचे तीन दिवसाचे प्रात्याक्षिकासह प्रशिक्षणाची सोय महामंडळाच्या सर्व प्रक्षेत्रावर उपलब्ध करून देण्यात येते. कालावधीः  ३ दिवस
प्रशिक्षण विषयः राज्यातील शेळ्या मेंढ्यांच्या जाती, शेळयांचा निवारा, आहार व्यवस्थापन, आरोग्य व्यवस्थापन, करडांची निगा, प्रक्षेत्रावरील दैनंदिन व्यवस्थापन, विमा, पैदास कार्यक्रमाचे नियोजन, पणन, शेळ्या करिता उपयुक्त चारा पिकांची लागवड, मुरघास तयार करायचे तंत्र, इ.
वर्ष शेळी मेंढी पालन प्रशिक्षणार्थी (संख्या) प्रशिक्षणा पोटी प्राप्त उत्पन्न (रु.)
2022-23 2511 1387500
2023-24 4757 2537500
2024-25 3247 1755500
4 पैदाशीकरिता बोकड/मेंढेनर/ शेळ्या / मेंढ्या पुरवठा महामंडळाच्या विविध प्रक्षेत्रावर डेक्कनी, संगमनेरी, व माडग्याळ जातीच्या मेंढ्या तसेच उस्मानाबादी, संगमनेरी बेरारी जातीच्या शेळ्या आहेत. स्थानिक शेळ्यांची व मेंढ्यांची अंनुबंनिक सुधारणा होण्याच्या दृष्टीने, प्रक्षेत्रावर शेळ्या/ मेंढ्यांची पैदास करुन त्यापासून उत्पादित होणारे जातिवंत उस्मानाबादी जातीचे सुधारित बोकड व डेक्कनी व संगमनेरी जातीचे सुधारित मेंढेनर पैदाशीकरिता शेतक-यांना उपलब्ध करुन देण्यांत येतात. तसेच  प्रगतशील शेतकरी, शेळी मेंढी पालक यांचे कडून जातिवंत बोकड मेंढेनर  व शेळ्या/ मेंढ्या  उपलब्ध करून पशुधन पुरवठा करण्यात येतो.
वर्ष पैदाशी करिता शेतकऱ्यांना पुरवठा करण्यात आलेल्या बोकड मेंढेनर (संख्या) पैदाशी करिता शेतकऱ्यांना पुरवठा करण्यात आलेल्या शेळया/ मेंढ्या (संख्या) पशुधन विक्री पोटी प्राप्त रक्कम (रु.)
2022-23 6179 56705 500602853
2023-24 9152 84967 728621433
2024-25 2941 29613 260919961
5 शेळ्या/ मेंढ्याकरिता उपयुक्त वृक्षांची रोपवाटिका तयार करणे कमी पर्जन्यभागामध्ये येणारे तसेच शेळ्या मेंढयाकरिता उपयुक्त असलेले चारा वृक्षाची रोपवाटिका सर्व प्रक्षेत्रावर तयार करण्यात आलेली आहे.
वर्ष वृक्ष लागवड (संख्या)
2022-23 29442
2023-24 4160
2024-25 5472
6 अझोला व गांडूळ खत प्रकल्प शेळ्या मेंढ्यांच्या खाद्यावरील खर्च कमी करण्याकरिता, खाद्याची पौष्टिकता वाढविण्याच्या दृष्टीने सर्व प्रक्षेत्रावर अझोला उत्पादन प्रकल्प स्थापन करण्यात आलेले आहेत. तसेच सर्व प्रक्षेत्रावर गांडूळ खत निर्मिती करण्यात येत आहे.
वर्ष अझोला उत्पादन (किलो) गांडूळखत उत्पादन (किलो)
2022-23 4589 17538
2023-24 5982 14195
2024-25 2709 9025