Punyashlok

महाराष्ट्र शासन | Government of Maharashtra

महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजना

अ.क्र. योजनेचे नाव योजनेचे स्वरूप मंजूर निधी (रु. कोटी)
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना राज्यातील भटक्या जमाती (भज -क) या प्रवर्गातील लाभार्थ्यांना २० मेंढया + १ मेंढानर अशा मेंढीगटाचे ७५% अनुदानावर वाटप करणे, सुधारित प्रजातींच्या नर मेंढ्यांचे ७५% अनुदानावर वाटप करणे, मेंढी पालनासाठी पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान देणे,मेंढी पालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान देणे,हिरव्या चाऱ्याचा मुरघास करण्याकरिता गासड्या बांधण्याचे यंत्र (Mini Silage Baler Cum Wrapper) खरेदी करण्यासाठी ५०% अनुदान देणे व पशुखाद्य कारखाने उभारण्यासाठी ५०% अनुदान देण्याचे प्रस्तावित आहे. २९.५० कोटी
मेंढ्यासाठी चराई अनुदान  राज्यातील भटक्या जमाती (भज -क) या मागास प्रवर्गातील धनगर व तत्सम समाजातील ज्या मेंढपाळ कुटुंबाकडे किमान २० मेंढया व १ मेंढानर एवढे पशुधन असणाऱ्या कुटुंबांना माहे जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीसाठी प्रतिमाहरु. ६,०००/- असे एकूण २४,०००/-  चराई अनुदान वाटप करणे. ८.३३ कोटी
मेंढी-शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान आदिवासी समाजाच्या उन्नतीकरिता राबविण्यात येणाऱ्या योजनेच्या धर्तीवर “भटक्या जमाती (भज -क) या मागास प्रवर्गातील धनगर व तत्सम समाजातील लाभर्थ्यांना राज्यस्तरीय योजने अंतर्गत भूमिहीन मेंढपाळ कुटुंबासाठी अर्धबंदिस्त, बंदिस्त मेंढीपालन करण्याकरिता १ गुंठाजागा खरेदीसाठी जागेच्या किंमतीच्या ७५ % अथवा किमान ३० वर्षासाठी भाडेकरारावर जागा घेणे साठी भाड्यापोटी द्यावयाच्या रकमेच्या ७५ % रक्कम एकवेळचे एकरकमी अर्थसहाय्य म्हणून कमाल रु. ५०,०००/- एवढे अनुदान वाटपकरणे ८.३३ कोटी
केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियाना अंतर्गत शेळी व मेंढी वीर्यमात्रा निर्मितीसाठी विभागीय प्रयोगशाळेची स्थापना करणे केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियाना अंतर्गत राज्यातील स्थानिक गावठी शेळ्यांमध्ये अनुवांशिक सुधारणा करणे करिता शेळी व मेंढी वीर्यमात्रा निर्मितीसाठी विभागीय प्रयोगशाळेची स्थापना पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळीविकास प्रक्षेत्र, तीर्थ, तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव येथे करण्याचे प्रस्तावित आहे. सदर प्रकल्पाची एकूण किंमत रु. ७१६.६५ लाख एवढी असून यामध्ये रु. ४३०.०० लाख केंद्र हिस्सा तसेच २८६.६५ लाख राज्य शासनाचा हिस्सा आहे ६.६६ कोटी
राष्ट्रीय पशुधन अभियाना अंतर्गत अस्तित्वात असलेल्या गायी - म्हशीच्या कृत्रिम रेतन केंद्रामधून शेळ्या मेंढ्या मधील कृत्रिम रेतन वृद्धिंगत करणे राज्यामध्ये सध्या  अस्तित्वात असलेल्या गायी - म्हशीच्या कृत्रिम रेतन केंद्रामधून शेळ्या मेंढ्या मधील कृत्रिम रेतन वृद्धिंगत करणे करिता शेळ्यांच्या कृत्रिम रेतनाचे साहित्य खरेदी करून पशुवैद्यकीय दवाखान्यांना पुरवठा करण्याचे प्रस्तावित आहे. १.१६ कोटी